काय आहे अण्णासाहेब पाटील योजना ? ( What is Annasaheb Patil Loan Scheme? ) : महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जावरील व्याज परतावा देण्यात येतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्देश | Annasaheb Patil Loan Scheme Goals

प्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठा समाजाच्या विकासासाठी सण १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली.
या महामंडळा मार्फत मराठा आर्थिक मागास तरुणांसाठी विविध कर्ज व्याज परतावा योजना राबल्या जातात.

वैयक्तिक व्याज परतावा योजना

१. सदर योजने अंतर्गत लाभार्थी वैयक्तिकरित्या कर्ज घेऊन व्याज परताव्याचा लाभ घेऊ शकतो.

२. या योजनेअंतर्गत महामंडळ लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ४.५ लाखापर्यत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल.

३. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील ७ दिवसांच्या कालावधीमध्ये (शासकीय सुट्टया वगळून) आपले पात्रता प्रमाणपत्र ( L.O.I ) मंजूर/ नामंजूर/ त्रुटी/ अपूर्ण असल्याबाबतचे आपणांस कळविण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व शर्ती | Annasaheb Pati Loan Scheme Terms & Conditions

१. प्रामुख्याने मराठा तथा ज्या प्रवर्गाकरिता कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा प्रवर्गातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
२. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
३. आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे स्पष्टीकरण- लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावे कि जे रु. 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र हवे अथवा कुटुंबाचे (पती व पत्नी) ITR प्रमाणे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखाच्या मर्यादेत असावे .
४. संबंधित व्यवसायाच्या बाबत व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
५. लाभार्थ्याचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
६. या योजनेअंतर्गत केवळ बँकेमार्फत मंजूर झालेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल.
७.. या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
८. अर्जकर्त्याने अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरावयाचे आहे.
९. अर्जदाराने या अर्जीत प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत, व्याज परतावा/माफी/Interest Subvention योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच अनुज्ञेय असेल. (उदा. व्याज परतावा आवश्यकता १२% वजा इतर योजनेतून घेतलेला लाभ ५% आहे = ७% एवढा या योजनेतून मिळणारा लाभ असेल.)

कागदपत्रांची यादी मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

 

Scroll to Top