मित्रांनो सध्या HSRP प्लेट बाबत अनेक बातम्या समोर येत आहे, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर काय होईल यात दंडच नाही तर तुमच्या वाहनांसोबत या गोष्टी देखील या ठिकाणी होऊ शकतात काय आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया, जुन्या वाहनांना हाय सेक्युरिटी स्टेशन नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे. hsrp number plate
आता तुमच्या या वाहनावर होणार कारवाई…….(hsrp number plate)
डिसेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, ज्यामुळे एप्रिल २०१९ पूर्वी विकल्या गेलेल्या आणि अजूनही रस्त्यावर धावणाऱ्या कोणत्याही वाहनावर HSRP अनिवार्य करण्यात आले. SOP मध्ये मार्च २०२५ चा शेवट HSRP लावण्याची अंतिम तारीख असल्याचे नमूद केले आहे अन्यथा मोटार वाहन कायदा आणि नियमांनुसार दंड आकारला जाईल. जर तुम्ही प्रक्रियेत गोंधळलेले असाल तर HSRP बद्दल तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा एक संक्षिप्त आढावा येथे आहे.
पण काहीजण नंबर प्लेट न लावण्याचा विचार करत आहे, तर असा विचार तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे, 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे
HSRP नंबर प्लेट ला online करण्यासाठी खालील whatsapp बटनावर क्लिक करा.
HSRP किंवा उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स या एक अद्वितीय क्रमांक आणि कोड असलेल्या छेडछाड-प्रतिरोधक प्लेट्स आहेत. हे संपूर्ण देशभरात मानक आहेत आणि विशेष न वापरता येणारे कुलूप वापरून जोडलेले आहेत जे HSRP काढून टाकल्यास तुटतात ज्यामुळे ते दुसऱ्यांदा बसवणे अशक्य होते. भारत सरकारने एप्रिल २०१९ नंतर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर HSRP वापरणे अनिवार्य केले आणि रस्ते आणि वाहनांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये घट होण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे असे म्हटले.
जर या HSRP नंबर प्लेट न लावण्याचा विचार करत असाल तर मग या ठिकाणी ही नंबर प्लेट न लावल्यास दंडच नाही तर अनेक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
वाहन धारकांनी त्यांच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, बोजा/ उतरवणे चढवणे दुहेरी, विमा आदि करणे तरी कामकाज थांबवण्यात येणारी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एचआरएसपी नंबर प्लेट असलेली वाहने संबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिलेल्या आहेत.
HSRP hsrp number plate नंबर प्लेट किंमत काय ?
इतर राज्यात जीएसटी सोडून दुचाकी प्रति वाहन 420 ते 480 रुपये, तीनचाकी 450 रुपये ते 800 रुपये, चार चाकी वाहन आणि जड वाहने 690 ते 800 रुपये इतके आहे तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी 450 रुपये ,3 चाकी 500, 4 चाकी चाकी जड वाहने 745 रुपये आणि यावरून राज्यातील दर व इतर राज्यांमधील दराप्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे असे या ठिकाणी बघायला मिळत आहे.
राज्यातील दर फिटमेंट चार्ज व्यतिरिक्त आहेत या विषयी माहिती SIAM च्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. असे परिवहन मंत्री यांनी सांगितले आहे.
जुन्या वाहनावर HSRP Number Plate लागू करण्याची प्रक्रिया काय असणार आहे ?
यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.